मुंबई -अभिनेता फरहान अख्तर सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याच्या आगामी 'तुफान' चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात फरहान बॉक्सरच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासोबतच फरहान आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर यांच्या नात्याच्या चर्चांनाही बॉलिवूडमध्ये उधाण आले आहे. 'तुफान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.
फरहान आणि शिबानी यांच्या नात्याबाबत जावेद अख्तर यांना विचारले असता, 'मला ही बातमी तुमच्याकडूनच समजत आहे. मी फरहानच्या वाढदिवशी पूर्ण वेळ त्याच्यासोबत होतो. पण, त्याने याबाबत मला काहीही सांगितले नाही. तुम्हाला माहित नाही, आजकालची मुले त्यांची गुपीतं फार जपतात', असे जावेद म्हणाले.
हेही वाचा -मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेलाचा देसी अवतार