मुंबई -बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सध्या 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ११ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रासोबत भूमिका साकारली आहे. त्याच्या आगामी 'तुफान' चित्रपटाबद्दलही बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच शूटिंग सुरू झालं आहे. मात्र, शूटिंगदरम्यान फरहानला इजा पोहोचली आहे.
फरहानने त्याच्या हाताचा 'एक्स रे' रिपोर्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हातामध्ये फ्रॅक्चर झाल्याचं पाहायला मिळते.
हेही वाचा -फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिकसोबत झळकणार अनुष्का?
'तुफान' हा चित्रपट बॉक्सिंगवर आधारित आहे. हा कोणता बायोपिक नाही. मात्र, बॉक्सिंगपटूची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. फरहानने आत्तापर्यंत बरेच अपडेट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.