मुंबई -बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर नववर्षात नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत तो 'तुफान' चित्रपटाची मागच्या वर्षापासून तयारी करत आहे. त्यामुळे यावर्षी तो 'बॉक्सर'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. फरहानने हा फोटो शेअर करून चाहत्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'भाग मिल्खा भाग' या चित्रपटानंतर राकेश मेहरा यांनी 'तुफान' चित्रपटासाठी फरहान अख्तरची निवड केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच्या शरीरयष्टीवरही मेहनत घेण्यात आली आहे. फरहानचा फर्स्ट लूक पाहून त्याने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज लावता येतो.
हेही वाचा -प्रियंका चोप्राने शेअर केला २०१९ च्या काही संस्मरणीय आठवणींचा व्हिडिओ