महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

टीका करणाऱ्या अभिनेत्याला फराह खानने केले ब्लॉक - Farah Khan latest news

अभिनेता कमाल आर खानने कोरिओग्राफर फराह खानवर टीकास्त्र सोडले आहे. त्याच्या या वागण्यामुळे फराहने त्याला ब्लॉक केले आहे.

फराह खान

By

Published : Oct 18, 2019, 11:32 PM IST

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान वादग्रस्त गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असतो. आता त्याने कोरिओग्रफर फराह खानवर टीकास्त्र सोडले आहे. फराहच्या आगामी 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटाची त्याने टर उडवली आहे. त्याच्या या वागण्यामुळे फराहने त्याला ब्लॉक केले आहे.

कमाल आर खानने ट्विटरवर लिहिलंय, ''फराह खानने मला ब्लॉक केले आहे. कारण 'सत्ते पे सत्ता' चित्रपट रिजीज झाला तर तो फ्लॉप होईल, असे मी म्हटले होते. यातून हे दिसतं की मानसिकदृष्ट्या ती हैराण झाली आहे. ती केवळ फालतू सिनेमा बनवू शकते. ह्रतिक रोशन आणि रोहित शेट्टीला शुभेच्छा.'' या शब्दात कमाल आर खानने फराहवर टीका केली आहे.

कमाल आर खानने 'देशद्रोही' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'बिग बॉस 3' मध्येही तो बराच चर्चेत राहिला होता. तो सध्या आपले रिव्ह्यू लिहून स्वतःला समिक्षक समजत असतो. नेहमी चर्चेत राहण्याचा तो प्रयत्न करीत असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details