महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नागा चैतन्यापासून विभक्त होणार का? या प्रश्नावर सामंथाने सोडले मौन - नागा चैतन्यापासून विभक्त होणार का?

तिरुमाला मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या अभिनेत्री सामंथाला एका पत्रकाराने छेडले. पती नागा चैतन्यापासून विभक्त होणार का असे त्याने विचारले. यावर ती म्हणाली की, ''मी एका मंदिरात आले आहे, तुला समजत नाही का?''

सामंथा अक्किनेनी
सामंथा अक्किनेनी

By

Published : Sep 20, 2021, 3:36 PM IST

Updated : Sep 20, 2021, 4:06 PM IST

हैदराबाद - सामंथा अक्किनेनी हिने अलीकडेच तिरुमाला मंदिरात देव दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्री तिरुमाला मंदिराच्या आवारातून बाहेर येत होती. यादरम्यान, एका पत्रकाराने तिला नागा चैतन्यापासून विभक्त होण्याच्या अफवांवर प्रतिक्रिया विचारली. या दरम्यान, अभिनेत्री तेलुगूमध्ये म्हणाली, 'गुडिकी वचनू, बुद्धी उंड (मी एका मंदिरात आलो आहे, तुला समजत नाही का?)'. असे म्हणत अभिनेत्रीने डोक्याकडे उंगली निर्देश केला, तिने तिच्या कपाळावर टिळा लावला होता.

सामंथा आणि नागा चैतन्यात बिनसल्याच्या अफवा

सामंथा आणि तिचा पती नागा चैतन्या यांच्यात पटत नसल्याच्या उफवांना ऊत आला आहे. सासरे नागार्जुनच्या वाढदिवसाला ती हजर नव्हती. तेव्हापासून माध्यामातून याबद्दल बातम्या येऊ लागल्या. दरम्यान, सामंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अक्कीनेनी आडनाव काढून टाकले व सामंथा एस असे केले. फिल्म कॉम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल विचारले असता, तिने याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला होता.

टीका झाल्यानंत मौन बाळगण्याचा आहे सामंथाचा स्वभाव

सामंथा म्हणाली, 'गोष्ट अशी आहे की, द फॅमिली मॅन किंवा त्यासाठी ट्रोलिंग करूनही, मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मी नेहमी अशीच आहे. या प्रकारच्या गदारोळावर मी प्रतिक्रिया देत नाही आणि तसा करण्याचा माझा हेतूही नाही.'

नागा चैतन्यच्या 'लव्ह स्टोरी'चा ट्रेलर लाँच

नागा चैतन्यच्या आगामी चित्रपट 'लव्ह स्टोरी'चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून, अभिनेत्री सामंथा हिने नागा चैतन्यासोबत असलेल्या नातेसंबंधाविषयीच्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला.

लव्ह स्टोरीचा ट्रेलर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, "विनर, लव्ह स्टोरीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा". सामंथाच्या पोस्टला प्रतिसाद देत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सामंथाचे ट्वीट शेअर करत त्याने लिहिले - धन्यवाद सॅम.

नागा चैतन्याचा 'लव्ह स्टोरी' चित्रपट शेखर कम्मूला यांनी निर्माण केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक रोमँटिक ड्रामा आहे, ज्यात नागासोबत सई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

घटस्फोट होणार असल्याची अफवा

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की दोघे घटस्फोट घेणार आहेत. मात्र, यामागचे कारण सांगण्यात आले की, नागा याला मुल हवे आहे. फॅमिली प्लॅनिंगसाठी सामंथाने काही काळ विश्रांती घ्यावी असे नागा चैतन्याला वाटते अशी चर्चा रंगली होती. मात्र दोघांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नाही.

हेही वाचा - कॅटरिना कैफने शेअर केला थक्क करणारा आकर्षक व्हिडिओ

Last Updated : Sep 20, 2021, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details