महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ग्लोबल इव्हेन्टमध्ये साडीत अवतरलेल्या सारा अलीवर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव - अभिनेत्री सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खान 25 सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या ग्लोबल सिटीझन लाईव्ह इव्हेंटसाठी जेव्हा साडीत अवतरली तेव्हा तिचे चाहत्यांनी भरपूर कौतुक केले. हातात बांगड्या, चांदीचा झुमका आणि बिंदीसह तिचा लूक खूपच सुंदर होता. इव्हेंटमधील साराचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर चाहत्यांनी तिची प्रशंसा करण्यास सुरुवात केली.

सारा अली खानचा साडीतील फोटो
सारा अली खानचा साडीतील फोटो

By

Published : Sep 27, 2021, 8:06 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचे चेहरा समोर आणला तरी तो कुर्ता आणि चुडीदारमधला असतो. या पोशाखातच तिला आपण अधिकतर पाहिले आहे. परंतु 25 सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या ग्लोबल सिटीझन लाईव्ह इव्हेंटसाठी ती जेव्हा साडीत अवतरली तेव्हा तिचे चाहत्यांनी भरपूर कौतुक केले.

ग्लोबल सिटीझन लाईव्ह मोहिमेला पाठिंबा देणारी सारा अली खान ही भारतातील ख्यातनाम व्यक्तींपैकी एक होती. या इव्हेन्टसाठी ती पूर्णपणे भारतीय झाली होती. रंगीबेरंगी साडीमध्ये ती कार्यक्रमाला पोहोचली होती. हातात बांगड्या, चांदीचा झुमका आणि बिंदीसह तिचा लूक खूपच सुंदर होता. इव्हेंटमधील साराचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर चाहत्यांनी तिची प्रशंसा करण्यास सुरुवात केली.

एका नेटिझनने लिहिले, "तिने आज आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असे काम केले आहे."

दुसरा म्हणाला की, "सारा साडीमध्ये किती सुंदर दिसत आहे, तिच्या बांगड्या, झुमका, बिंदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिचे स्मितहास्य याचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडले."

साराने इन्स्टाग्रामवर इव्हेंटमधील फोटो देखील शेअर केला आणि लिहिले: "वुमन इन सारी आर ऑलवेज प्यारी ( साडीतील महिला नेहमी सुंदर असतात)."

चित्रपट आघाडीवर, सारा अली खानकडे आनंद एल रायचा आगामी अतरंगी रे हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या रिलीजची ती प्रतीक्षा करीत आहे. यात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा - प्रभासच्या 'आदिपुरुष'ची अक्षयच्या सिनेमासोबत होणार बॉक्स ऑफिसवर 'टक्कर'!!

ABOUT THE AUTHOR

...view details