महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दरबार' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी मुंबईत 'रजनी उत्सव'! - मुंबईत 'रजनी उत्सव'

रजनीकांत यांचा फॅनग्रुप असलेल्या 'रजनी महाराष्ट्र'ने सायन येथील मंदिरात पूजापाठ करून रजनीकांत यांच्या प्रतिमेसमोर जल्लोष करण्यात आला. शिवाय वाजत गाजत सायन पीव्हीआरपर्यंत पालखी देखील काढली.

Fans celebrates Rajinikanth film Darbar show in mumbai
'दरबार' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी मुंबईत 'रजनी उत्सव'!

By

Published : Jan 9, 2020, 10:46 AM IST

मुंबई -सुपरस्टार आणि कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षीत 'दरबार' हा चित्रपट आज म्हणजेच ९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी रजनीकांत यांचे चाहते उत्सुक होते. अनेकांसाठी रजनीकांत यांच्या चित्रपट प्रदर्शनाचा दिवस म्हणजे सुट्टीच्या वारापेक्षा किंवा एखाद्या मोठ्या सणापेक्षा कमी नसतो. यंदाही हिच जादू कायम आहे.

रजनीकांत यांचा 'दरबार' प्रदर्शित होणार म्हटल्यावर मुंबईतील सायन परिसरात वेगळीच धामधूम पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चाहत्यांनी पूजापाठ करत एकप्रकारे 'रजनी उत्सव'च साजरा केला आहे.

रजनीकांत यांचा फॅनग्रुप असलेल्या 'रजनी महाराष्ट्र'ने सायन येथील मंदिरात पूजापाठ करून रजनीकांत यांच्या प्रतिमेसमोर जल्लोष करण्यात आला. शिवाय वाजत-गाजत सायन पीव्हीआरपर्यंत पालखी देखील काढली, त्यानंतर रजनीकांत यांच्या ६८ फूट कट आऊटला दुधाने अंघोळ घातली.

महिलांनी देखील पारंपरिक पद्धतीने पूजा हवन करत रजनीकांत यांना खूप आयुष्य लाभो आणि चित्रपटाने चांगला व्यवसाय करावा, यासाठी पूजा केली. तरुण चाहत्यांनी तर प्रदर्शनापूर्वीच ठेका धरला.

'दरबार' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी मुंबईत 'रजनी उत्सव'!

रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे सायन येथील अरोरा चित्रपटगृहात दसरा-दिवाळीसारखे उत्सवी वातावरण होते. यावेळी देखील परंपरेप्रमाणे येथे जोरदार तयारी कालपासून सुरू होती. नेहमीप्रमाणे रजनीकांत यांचे ६८ फूट उंच कटआऊट येथे लावण्यात येणार आले होते. यापूर्वी '२.०', 'काला' या चित्रपटांच्यावेळीही येथे उभारण्यात आलेल्या ६७ फूट उंच कटआऊटनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

पूजेनंतर आज सकाळी सहा वाजता 'दरबार'चा पहिला शो दाखवण्यात आला. अर्थात रजनीकांत यांच्या चाहत्यांची फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. यापूर्वीही 'कबाली' आणि 'काला'चे शो पहाटे ठेवण्यात आले होते.

'रजनीकांत यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. ते समाजपयोगी काम करतात. ते आमच्यासाठी देवाप्रमाणे आहेत. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यामुळे आम्ही सर्व चाहते एकत्र येत त्यांच्या चित्रपटाचा उत्सव साजरा करतो', असे रजनीकांत फॅनक्लबचे अध्यक्ष श्याम अंतीमुलम यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details