मुंबई -कोरोना संक्रमणानंतर मनोरंजनसृष्टी आता थोडी सावरताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या मध्यावर लॉकडाउन सुरू असताना शुटिंग्सची परवानगी देण्यात आली होती. आता तब्बल ११ महिन्यांनंतर चित्रपटगृह पूर्णक्षमतेने सुरू करण्याची सरकारने घोषणा केली आहे. निर्मातेसुद्धा आपले चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित व्हावेत यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शनाच्या तारखादेखील घोषित होऊ लागल्या आहेत. निर्माते, दिग्दर्शकांसोबत सर्वजण त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्याची तयारी करत असून, हिंदीसोबतच अनेक मराठी चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा घोषित केल्या आहेत.
क्रिकेटची पार्श्वभूमी ल्यालेल्या ‘फ्री हिट दणका' मधून दिसणार ‘फॅन्ड्री’फेम सोमनाथ अवघडे! - somnath avaghade free hit danka
मराठी चित्रपट 'फ्री हिट दणका'ची देखील प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत 'फ्री हिट दणका'च्या टीमने हा सिनेमा १६ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
![क्रिकेटची पार्श्वभूमी ल्यालेल्या ‘फ्री हिट दणका' मधून दिसणार ‘फॅन्ड्री’फेम सोमनाथ अवघडे! सोमनाथ अवघडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10518715-thumbnail-3x2-ghghgh.jpg)
आता मराठी चित्रपट 'फ्री हिट दणका'ची देखील प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत 'फ्री हिट दणका'च्या टीमने हा सिनेमा १६ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या प्रेमाच्या महिन्याचे औचित्यसाधून या टीमने चित्रपटाच्या नायकाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. अपूर्वा एस. या अभिनेत्रीसोबत नायक म्हणून फॅन्ड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडे दिसणार आहे. सिनेमा क्रिकेटच्या अवतीभवती फिरणारा असावा आणि चित्रपटाच्या नावातूनही या चित्रपटाचा क्रिकेटशी संबंध असेल असे सूचित होत आहे.
यापूर्वीच सैराट या सिनेमातील अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही हिट जोडी जाहीर करण्यात आली होती. आता सोमनाथ अवघडेचीही घोषणा झाली आहे. हे सर्व मंडळी गुणी दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या हाताखालून गेल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा पाया घट्ट झालेला असणार याबद्दल शंका नाही.
अतुल रामचंद्र तरडे आणि आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे, आणि सुनिल मगरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे सहनिर्माते आहेत. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांची असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे. सिनेमाला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटाचे छायाचित्रण हजरत शेख (वल्ली) यांचे आहे.