महाराष्ट्र

maharashtra

देवदत्त बाजीच्या 'मोरे पिया'मध्ये ख्यातनाम असद खान यांचे अप्रतिम सतार वादन!

ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान ह्यांच्या ‘स्लमडॉग मिलियनेर’ या ऑस्कर विजेत्या अल्बम मधील ‘मौसम अँड एस्केप’ या गाण्यात आपल्या अप्रतिम सतार वादनाने अवघ्या जगभरात नाव कमावले असद खान यांनी मराठमोळा संगीतकार देवदत्त बाजीच्या 'मोरे पिया'मध्ये देखील आपल्या सतार वादनाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्रीय लोकसंगीतासाठी नावाजलेल्या देवदत्तने या गाण्यातून पारंपरिक व पाश्चात्य प्रकारांचा सुरेख मेळ साधला आहे.

By

Published : Mar 1, 2021, 2:58 PM IST

Published : Mar 1, 2021, 2:58 PM IST

Asad Khan's amazing satar playing
असद खान यांचे अप्रतिम सतार वादन

मुंबई - असद खान हे सतार वादनात माहीर आहेत व त्यांनी जोधा अकबर, रावण सारख्या चित्रपटांतील गाण्यात सतार वादन केलं आहे. तसेच ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान ह्यांच्या ‘स्लमडॉग मिलियनेर’ या ऑस्कर विजेत्या अल्बम मधील ‘मौसम अँड एस्केप’ या गाण्यात आपल्या अप्रतिम सतार वादनाने अवघ्या जगभरात नाव कमावले. त्यांनी ‘कॉमनवेल्थ गेम्स’ च्या थीम सॉंग साठीही सतार वादन केलेलं आहे. असे हे प्रसिद्ध असद खान यांनी मराठमोळा संगीतकार देवदत्त बाजीच्या 'मोरे पिया'मध्ये देखील आपल्या सतार वादनाचे योगदान दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारलेल्या 'फत्तेशिकस्त' व आगामी 'जंगजौहर' या सिनेमांचा युवा संगीतकार 'देवदत्त मनिषा बाजी' नव्या धाटणीचं गाणं घेऊन लवकरच आपल्या समोर येतोय. 'मोरे पिया' हे गाण्याचे बोल असून पाश्चात्य इलेकट्रॉनिका व चिलस्टेप लाउंज प्रकारात त्यानं याची सुरावट गुंफली आहे. महाराष्ट्रीय लोकसंगीतासाठी नावाजलेल्या देवदत्तने या गाण्यातून पारंपरिक व पाश्चात्य प्रकारांचा सुरेख मेळ साधला आहे.

देवदत्त बाजीच्या 'मोरे पिया' मध्ये, दाक्षिणात्य सिनेमांनाही आपल्या आवाजाने भुरळ घालणारी गायिका आनंदी जोशी हिचा आवाज लाभला आहे. गाण्याविषयी बोलताना देवदत्त म्हणाला, ‘असद खान व आनंदी जोशी यांच्याबरोबर गाणं करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर निरनिराळे जॉनर सादर करण्याचा माझा प्रयत्न या गाण्यामुळे साध्य होत आहे.'

'मोरे पिया' या गाण्याची निर्मिती व शब्दरचना देवदत्तची असून ब्रज भाषेतल्या ओळी श्रुती कुलकर्णी हिने लिहिल्या आहेत.
हेही वाचा - जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांच्यात काय साम्य आहे?

ABOUT THE AUTHOR

...view details