मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटामध्ये मूख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, चित्रपटाच्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यातला वाद खुद्द करण जोहरही सोडवू शकत नसल्याचं त्यानेच म्हटलं आहे.
खरंतर, 'सूर्यवंशी'च्या सेटवर अक्षय आणि रोहितचा वाद झाल्याच्या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आले आहे. काही माध्यमांमध्ये त्या दोघांमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, अक्षयने एक व्हिडिओ शेअर करून दोघांच्या वादाच्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा -'केटी पेरी फिव्हर': पाहा जॅकलिनची केटीसोबतची खास सेल्फी