मुंबई -गेल्या दीड-दोन वर्षांत वेब सिरीज अचानकपणे जास्त पाहू जाऊ लागल्या आहेत. कोरोनाने चित्रपट व्यवसायाचे नुकसान केले. परंतु त्याच कोरोनामुळे वेब सिरीजना सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. चित्रपट महोत्सवाच्या वेळापत्रकात आता वेब सिरीजनासुद्धा स्थान मिळू लागले आहे. अत्यंत वेगळ्या धाटणीचा चित्रपट ‘तुंबाड’ चे निर्माते आनंद गांधी यांनी नुकतीच ‘ओके कंप्यूटर' या वेब सिरीजची निर्मिती केली होती. आणि ती प्रदर्शित झाल्यावर तिचे कौतुकही झाले. अजून एका कौतुकाची गोष्ट म्हणजे ‘ओके कंप्यूटर' चा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम २०२१ मध्ये यूरोपीयन प्रीमियर संपन्न झाला आहे. आनंद गांधी त्यांच्या ‘तुंबाड’ आणि 'शिप ऑफ थीसस' साठी ओळखले जातात.
हॉलंडमधील रॉटरडॅम मध्ये संपन्न झाला 'ओके कंप्यूटर' चा यूरोपीयन प्रीमियर! - disney hoststar
आनंद गांधी यांच्या मेमेसिस स्टूडियोजद्वारा निर्मित सहा भागांची ही सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. ही एक दृष्टिपथात असलेल्या यथार्थवादी भविष्याची कल्पना आहे. ज्यात चहावाल्या 'मावशी' बॉट्स, इमर्सिव वीआर वर्ल्ड आणि रोबोट मसीहा आदींचा समावेश आहे. यात ओके कंप्यूटर जगाला 'इंडो-फ्यूचरिज्म'ची ओळख करून देतो.
ओके कंप्यूटर