महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हैदराबादमध्ये 'छिछोरे'ची प्रेस स्क्रीनिंग, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - सुशांत सिंग राजपूत

नितेश तिवारींनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी यापूर्वीदेखील 'दंगल' सारखा चित्रपट प्रेक्षकांना दिला आहे. त्यामुळे 'छिछोरे' चित्रपटाकडूनही चाहत्यांच्या चांगल्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

हैदराबादमध्ये 'छिछोरे'ची प्रेस स्क्रीनिंग, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

By

Published : Sep 6, 2019, 8:36 AM IST

हैदराबाद -अभिनेतता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांचा मल्टीस्टारर असलेला 'छिछोरे' हा चित्रपट आज (६ सप्टेंबर) प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासून चाहत्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. कॉलेजवयीन मैत्रीचे दिवस पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्यामुळे चित्रपटाला तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळेल, असे चित्र सध्या पाहायला मिळतेय.

प्रदर्शनापूर्वी हैदराबादमध्ये 'छिछोरे' चित्रपटाची प्रेस स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. ई-टीव्ही भारतच्या प्रतिनिधीनेही या ईव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी स्क्रिनिंग दरम्यान प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

हैदराबादमध्ये 'छिछोरे'ची प्रेस स्क्रीनिंग, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

नितेश तिवारींनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी यापूर्वीदेखील 'दंगल' सारखा चित्रपट प्रेक्षकांना दिला आहे. त्यामुळे 'छिछोरे' चित्रपटाकडूनही चाहत्यांच्या चांगल्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

स्क्रिनिंग दरम्यानही प्रेक्षकांनी या चित्रपटाविषयी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपटातील सर्व पात्रांचे कौतुकही होत आहे. हा एक पूर्णत: मनोरंजनपट आहे, जो तुम्हाला खळखळून हसवेल, असेही काहींनी म्हटले आहे. आता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details