महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इम्रान हाश्मीच्या 'द बॉडी'चा गुढ ट्रेलर प्रदर्शित - #TheBodyTrailer

'द बॉडी' या चित्रपटाची कथा गुढ रहस्यांनी भरलेली आहे. सुनीर क्षेत्रपाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर जीतू जोसेफ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

इमरान हाश्मीच्या 'द बॉडी'चा गुढ ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Nov 15, 2019, 6:30 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा आगामी 'द बॉडी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. इम्रान हाश्मीसोबत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचीही या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. अनेक रहस्यांनी भरलेला हा ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवतो.

'द बॉडी' या चित्रपटाची कथा गुढ रहस्यांनी भरलेली आहे. सुनीर क्षेत्रपाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर जीतू जोसेफ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

अभिनेत्री वेदिका आणि सोभिता धूलिपाला यांचीदेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. एका महिलेची 'बॉडी' रहस्यमयरित्या गायब होते. तिच्या बॉडीच्या शोधासाठी इम्रान हाश्मी आणि ऋषी कपूर कशाप्रकारे शोध घेतात, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
क्राईम मिस्ट्री थ्रिलर असलेल्या या चित्रपटाची उत्कंठा आता वाढली आहे. या चित्रपटात हॉरर दृश्येही पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट १३ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details