महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'द बॉडी' चित्रपटातील दुसरं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित, पाहा इमरान हाश्मी- वेदिकाची केमेस्ट्री - Emraan hashmi new song

इमरान हाश्मी यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून या गाण्याची लिंक शेअर केली आहे. या गाण्यात त्याच्यासोबत नवोदित अभिनेत्री वेदिकाची भूमिका पाहायला मिळते.

'द बॉडी' चित्रपटातील दुसरं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित, पाहा इमरान हाश्मी- वेदिकाची केमेस्ट्री

By

Published : Nov 22, 2019, 1:14 PM IST

मुंबई -अभिनेता इमरान हाश्मी याच्या आगामी 'द बॉडी' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. गुढ असलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटातील पहिलं रोमॅन्टिक गाणं 'आईना' हे देखील अलिकडेच प्रदर्शित झालं. आता आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

जुबिन नौटियालच्या आवाजातील 'मै जानता हुं' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. समीर अंजान यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, शमीर टंडन यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा -इमरान हाश्मीच्या 'द बॉडी' चित्रपटाचं पहिलं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित

इमरान हाश्मी यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून या गाण्याची लिंक शेअर केली आहे. या गाण्यात त्याच्यासोबत नवोदित अभिनेत्री वेदिकाची भूमिका पाहायला मिळते.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचीही महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ते यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. तर, शोभिता धुलीपाला ही देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ती इमरानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

हेही वाचा -इम्रान हाश्मीच्या 'द बॉडी'चा गुढ ट्रेलर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details