महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'चेहरे' चित्रपटाची रिलीझ डेट पुन्हा बदलली, 'गुलाबो सिताबो' चित्रपटासोबतची टक्कर टळली - Amitabh Bachchan look in chehare

'गुलाबो सिताबो' या चित्रपटाच्या मेकर्सच्या विनंतीवरून अखेर 'चेहरे' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची तारीख बदलली आहे.

New release date Of Chehre Film, makers of Gulabo Sitabo request to avert a clash, #EmraanHashmi, #AmitabhBachchan, #Chehre, #GulaboSitabo,  Chehre Film release date change, 'चेहरे' चित्रपटाची नवी रिलीझ डेट,  Emraan Hashmi, Amitabh Bachchan look in chehare, Chehre Film new glimpse
'चेहरे' चित्रपटाची रिलीझ डेट पुन्हा बदलली, 'गुलाबो सिताबो' चित्रपटासोबतची टक्कर टळली

By

Published : Jan 21, 2020, 1:50 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये एकाच दिवशी एकापेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. बऱ्याचदा बिग बजेट असलेले चित्रपटही एकाच दिवशी प्रदर्शित होतात. त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावरही परिणाम होताना दिसतो. त्यामुळे इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'चेहरे' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलवण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या 'चेहरे' चित्रपटाचा फर्स्ट लुक बऱ्याच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर वारंवार या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरचीही प्रतिक्षा करावी लागत आहे. अशातच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' हा चित्रपटही 'चेहरे' चित्रपटाच्या शर्यतीत उतरला होता. त्यामुळे या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार होती.

हेही वाचा -अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

'गुलाबो सिताबो' या चित्रपटाच्या मेकर्सच्या विनंतीवरून अखेर 'चेहरे' चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची तारीख बदलली आहे. हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट १७ जुलै २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. हा चित्रपट गुढ रहस्यावर आधारित आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नवा लुकही पाहायला मिळणार आहे. अलिकडेच त्यांनी या चित्रपटातील त्यांचे काही लुक सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा -जितेंद्र जोशी, अमृता खानविलकरचा 'चोरीचा मामला', पाहा धमाल ट्रेलर

ABOUT THE AUTHOR

...view details