महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'Emmy Awards २०१९' मध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स' ठरला 'बेस्ट ड्रामा', तर, या सीरिजला मिळाले सर्वाधिक पुरस्कार

'गेम ऑफ थ्रोन्स'चे ८ भाग प्रदर्शित झाले होते. या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले आहेत.

By

Published : Sep 23, 2019, 1:02 PM IST

'Emmy Awards २०१९' मध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स' ठरला 'बेस्ट ड्रामा', तर, या सीरिजला मिळाले सर्वाधिक पुरस्कार

लॉस ऐंजेलिस - 'एमी अवार्ड्स २०१९' या नामांकित पुरस्कार सोहळ्यात 'गेम ऑफ थ्रोन्स' या चित्रपटाने 'बेस्ट ड्रामा' या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळवला आहे. 'मायक्रोसॉफ्ट थिएटर' येथे रविवारी (२२ सप्टेंबर) हा पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये 'फ्लिबॅग' (Fleabag) आणि सेरनोबील (Chernobyl) या दोन सीरिजला सर्वाधिक पुरस्कार मिळवले आहेत.

'गेम ऑफ थ्रोन्स'चे ८ भाग प्रदर्शित झाले होते. या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले आहेत. 'गेम ऑफ थ्रोन्स'ची एमी पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 'एचबीओ' (HBO) सीरिजला १६१ वेळा या पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळाले आहे. तर, ४७ एमी पुरस्कार या सीरिजने पटकावले आहेत.

तब्ब्ल ८ वर्षानंतर 'गेम ऑफ थ्रोन्स'चा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचाही या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला.

वाचा संपूर्ण यादी -

  • बेस्ट कॉमेडी - 'फ्लिबॅग' (Fleabag)
  • बेस्ट ड्रामा - गेम ऑफ थ्रोन्स (GoT)
  • बेस्ट लिमिटेड सीरिज - सेरनोबील (Chernobyl)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - Phoebe Waller-Bridge, Fleabag
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - बील हेडर , बॅरी (Bill Hader, Barry)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (ड्रामा) - बिली पोर्टेर, पोझ (Billy Porter, Pose)

ABOUT THE AUTHOR

...view details