महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Elvis trailer: किंग ऑफ रॉक 'एन' रोल 'एल्विस' चा ट्रेलर रिलीज - एल्विस प्रेस्लीचा बायोपिक

किंग ऑफ रॉक 'एन' रोल एल्विस प्रेस्लीचा बायोपिक चित्रपट 'एल्विस' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. बाज लुहरमन यांनी याचे दिग्द्रशन केले असून ऑस्टिन बटलरचीयात मुख्य भूमिका आहे.

'एल्विस' चा ट्रेलर रिलीज
'एल्विस' चा ट्रेलर रिलीज

By

Published : Feb 18, 2022, 4:21 PM IST

वॉशिंग्टन (यूएस)- किंग ऑफ रॉक 'एन' रोल एल्विस प्रेस्ली या ऑस्टिन बटलरची भूमिका असलेल्या बाज लुहरमनच्या आगामी बायोपिकचा पहिला ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला आहे.

ट्रेलर रिलीज करेपर्यंत वॉर्नर ब्रदर्सच्या या चित्रपटाचे शीर्षक ठरले नव्हते. अखेरीस याचे शीर्षक 'एल्विस' असेल हे स्पष्ट झाले आहे. टॅलेंट मॅनेजर कर्नल टॉम पार्करची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या टॉम हँक्सने चित्रपटात सूत्रधाराची भूमिका केली आहे.

एल्विसमध्ये सर्व-स्टार कलाकारांचा समावेश आहे ज्यात एल्विसची पत्नी प्रिसिला म्हणून ऑलिव्हिया डीजोंगे, सिस्टर रोझेटा थार्पेच्या भूमिकेत गायक-गीतकार योला, जिमी रॉजर्सच्या भूमिकेत कोडी स्मित-मॅकफी, बीबी किंगच्या भूमिकेत केल्विन हॅरिसन ज्युनियर, जेरी शिलिंगच्या भूमिकेत ल्यूक ब्रेसी यांचा समावेश आहे. मॅगी गिलेनहालने प्रेस्लीची आई, ग्लॅडिस प्रेस्ली ही भूमिका केली आहे.

2013 मध्ये द ग्रेट गॅटस्बी नंतर लुहरमनचा 'एल्विस' हा पहिला वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. लुहरमनने दिग्दर्शनासाठी वाटाघाटी केल्यानंतर प्रथम एप्रिल 2014 मध्ये घोषणा केली गेली. जुलै 2019 मध्ये, बटलरला कास्टिंग प्रक्रियेनंतर चित्रपटाचा स्टार म्हणून ठरवण्यात आले. त्यानंतर एन्सल एल्गॉर्ट, साइल्स टेल्लर आणि हॅरी स्टाइल्स यांचा समावेश करण्यात आला.

2020 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये चित्रपटाचे प्रॉडक्शन सुरू झाले, परंतु हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा यांची COVID-19 चाचणी पॉझिटीव्ही आल्यानंतर ते थांबवण्यात आले. त्या वर्षाच्या उत्तरार्धात शूटिंग पुन्हा सुरू झाले आणि महामारीमुळे रिलीजची तारीख अनेक वेळा मागे ढकलली गेली. हा चित्रपट 24 जून रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे. त्यानंतर 45 दिवसांनी HBO मॅक्स रिलीज होणार आहे. क्रेग पियर्स, जेरेमी डोनर आणि सॅम ब्रोमेल या सह-लेखकांसह लुहरमन यांनी याचे दिग्दर्शन, सह-निर्मिती आणि सह-लेखन केले आहे. अतिरिक्त निर्माता कॅथरीन मार्टिन, पॅट्रिक मॅककॉर्मिक, अँड्र्यू मिटमन, शुयलर वेइस आणि गेल बर्मन, कार्यकारी निर्माता रॉरी कोस्लो आहेत.

हेही वाचा -विजय देवरकोंडाच्या 'लायगर'चा सर्वात मोठा 'ओटीटी' करार?

ABOUT THE AUTHOR

...view details