महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एकता कपूरने जितेंद्र यांच्या नावावरुन ठेवले बाळाचे नाव; शेअर केली भावनिक पोस्ट

टेलिव्हिजन क्विन आणि आघाडीची दिग्दर्शिका अशी ओळख असेलली एकता कपूर पहिल्यांदाच सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे.

एकता कपूर

By

Published : Feb 1, 2019, 9:35 AM IST

मुंबई - टेलिव्हिजन क्विन आणि आघाडीची दिग्दर्शिका अशी ओळख असेलली एकता कपूर पहिल्यांदाच सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे. २७ जानेवारीला तिने सरोगसीतून मुलाला जन्म दिला आहे. एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर हा देखील सरोगसीच्या माध्यमातून सिंगल पॅरेंट बनला होता. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आता एकताही सिंगल मदर बनली आहे.


तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांनी दिली होती. तिच्या बाळाचे नाव तिने जितेंद्र यांच्या नावावरूनच ठेवले आहे. रवी कपूर असे तिच्या बाळाचे नाव ठेवले असून यासोबतच तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.


'आई होणं हा जगातल्या सुंदर अनुभवांपैकी एक आहे. माझ्या आयुष्यात आता हे 'पालकत्त्व' पर्व सुरू झालं आहे. बाळाच्या आगमनानंतर माझ्या सोबतच माझ्या कुटुंबामध्ये किती आनंदाचं वातावरण आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही', अशा भावना एकता कपूरने सोशल मीडीया पोस्टमध्ये लिहून व्यक्त केल्या आहेत.


एकता कपूरने अद्याप लग्न केलेले नाही. मात्र, तिला आई बनण्याची इच्छा असल्यामुळे तिने सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला होता. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, तिने बाळाला सांभाळण्यासाठी मानसीकरित्या पूर्व तयारी केल्यानंतरच आई होण्याचा निर्णय घेतला होता. बॉलिवूडमध्ये तुषार कपूर प्रमाणेच करण जोहर हा देखील सिंगल पॅरेंट आहे. त्यालाही सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळी मुलं आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details