महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

FILM REVIEW: समलैंगिक नात्यावर भाष्य करणारा 'एक लडकी को देखा तो...' - sonam kapoor

चित्रपटात एका पंजाबी कुटुंबाची कथा दाखवली आहे. ज्यात सोनम स्वीटी नावाच्या पंजाबी मुलीचे पात्र साकारते.

एक लडकी को देखा तो ऐसा लगा

By

Published : Feb 1, 2019, 11:28 PM IST


मुंबई - १९९४ साली आलेल्या '१९४२ अ लव्हस्टोरी' या चित्रपटातील एक लडकी को देखा तो ऐसा लगा गाण्यानं प्रेक्षकांवर भूरळ पाडली. या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. मनीषा कोइराला आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या याच गाण्याच्या ओळींवर आपल्या चित्रपटाचे शीर्षक देत शैली चोप्राने एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' चित्रपट आज प्रदर्शित झाला.


चित्रपटात एका पंजाबी कुटुंबाची कथा दाखवली आहे. ज्यात सोनम स्वीटी नावाच्या पंजाबी मुलीचे पात्र साकारते. चित्रपटाचे नाव आणि ट्रेलर पाहता या चित्रपटात राजकुमार राव आणि सोनम कपूर यांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार, अशी प्रेक्षकांची समजूत होती. मात्र, चित्रपटात या उलट आहे. सिनेमा जसजसा पुढे जातो तसे अनेक धक्कादायक खुलासे होतात. जे चित्रपटाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. कारण, 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' ही ओळ राजकुमारच्या नव्हे तर सोनमच्या भावनांशी जुळणारी असते.

लहानपणापासूनच ती लग्नाचे स्वप्न पाहत असते. त्यामुळे, तारुण्यात आल्यावर तिचे वडिल अनिल कपूर म्हणजेच बलबीर चौधरी तिचा विवाह साहिल मिर्झा (राजकुमार राव) नावाच्या एका लेखक-दिग्दर्शकासोबत जमवतात. मात्र, यामुळे स्वीटी म्हणजेच सोनमला धक्का बसतो. कारण, तिचं प्रेम कोणा मुलावर नसून एका मुलीवर असते. ही गोष्ट स्वीटीच्या भावाला समजते. यानंतर चित्रपटात एक वेगळाच ट्विस्ट येतो. समलैंगिक किंवा लेस्बियन लव्हस्टोरीसारखा बोल्ड विषय या चित्रपटातून हाताळण्यात आला आहे. विशेष म्हणजे शैली चोप्राने या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं असून तिने हाताळलेल्या या विषयाचं आणि चित्रपटाचं विशेष कौतुक होत आहे. एक क्षण खळखळून हसवणारा आणि दुसऱ्याच क्षणी प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा हा चित्रपट एकदा तरी नक्कीच पाहावा असा आहे.

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. विशेषतः यातील सोनम कपूरचा अभिनय प्रेक्षकांची मने जिंकतो. बॉलिवूडमधील प्रेमाची व्याख्या बदलणारा हा चित्रपट नव्याने विचार करायला भाग पाडणारा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details