महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Tollywood Drugs Case : रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजासह 12 जणांना ED ची नोटीस - drugs case

रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजा, पुरी जगन्नाथ यांच्यासह 12 जणांना प्रवर्तन निदेशालयाने चार वर्षे जुन्या असलेल्या ड्रग्ज प्रकरणात नोटीस बजावली आहे.

ED summons Tollywood celebrities in drugs case
रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजासह 12 जणांना ED ची नोटीस

By

Published : Aug 26, 2021, 7:53 AM IST

हैदराबाद - प्रवर्तन निदेशालयाने चार वर्षे जुन्या असलेल्या ड्रग्ज प्रकरणात टॉलीवुडच्या टॉपचे अभिनेते, अभिनेत्री आणि डायरेक्टर्सना नोटीस पाठवली आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजा, पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे. रकुल प्रीत सिंह 6 सप्टेंबर, राणा दग्गुबाती 8 सप्टेंबर, रवी तेजा 9 सप्टेंबर आणि पुरी जगन्नाथ 31 सप्टेंबर या तारखांना त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.

तेलंगणा उत्पादन शुल्क आणि निषेध विभागाने अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता यात 12 सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. विभागाने 30 लाख रुपयांचे ड्रग जप्त केल्यानंतर या तक्रारी आणि आरोपपत्र दाखल केले. चार वर्षांपूर्वी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले होते. तेव्हा उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पुराव्यांच्या अभावी चित्रपट कलाकारांवर कोणतीही कारवाई केली नव्हती. नव्हे तर त्यांना चौकशीसाठीही बोलावले नव्हते.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणातही रकुल प्रीतचे नाव -

अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर गाजलेल्या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणातही रकुल प्रीतचे नाव समोर आले होते. यावेळी मुंबई एनसीबीकडून तीची चौकशीही झाली होती. तेव्हा रियासोबत ड्रग्जबाबत चॅट केल्याचे तिने मान्य केले होत. मात्र, अमली पदार्थाचे सेवन केले नसल्याचे तीने म्हटलं होतं. रकुलप्रीतने यावेळ कोणत्याही ड्रग्ज पेडलरसोबत संपर्कात असल्याचंही नाकारलं होतं.

राणा दग्गुबाती विषयी...

बाहुबली चित्रपटातून प्रसिद्ध झालेला भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबाती हा प्रसिद्ध अभिनेता आहे. राणाने आपल्या कारकिर्दीमध्ये एकदापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. राणानं बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपट केले. ज्यात त्यानं अभिनेत्री बिपाशा बासुसोबत काम केलं, खिलाडी अभिनेता अक्षय कुमारसोबतसुद्धा राणानं स्क्रिन शेअर केली.दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तर त्यानं कमालीचे अॅक्शन सीन दिलेत, यासाठी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं. कोरोना काळात राणा त्यांच्या लग्नामुळे खास चर्चेत होता.

हेही वाचा -ड्रग्ज प्रकरणी रकुल प्रीत सिंहची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, मीडिया कव्हरेज थांबवण्याची केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details