पुणे - दरवर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या पुण्यातील निगडी प्राधिकरण येथील घरी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करते. यावर्षी देखील तिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी इको फ्रेंडली बाप्पांचे आगमन
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. यावर्षी तिने आणि भाऊ अतुल यांनी मिळवून शंकराचे रूप असलेली गणेशाची मूर्ती शाडू मातीपासून बनवली आहे.
शाडू मातीचा वापर करून गणेशाची मूर्ती दरवर्षी सोनाली आणि भाऊ अतुल बनवत असतात, असं तिने सांगितले आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत नटरंग फेम अभिनेत्री सोनालीच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी तिने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. दरम्यान, करोना योद्यांचे सोनालीने कौतुक केले असून गणेशभक्तांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन तिने केले आहे. तर, गणेशोत्सव साजरा करत असताना सार्वजनिक गणपती मंडळांनी रक्तदान, प्लाझ्मा दान असे उपक्रम घ्यावेत असे तिने आवाहन केले आहे.
यावर्षी तिने आणि भाऊ अतुल यांनी मिळवून शंकराचे रूप असलेली गणेशाची मूर्ती शाडू मातीपासून बनवली आहे. गेली तीन वर्षे झाले ती निगडी येथील घरी गणेशोत्सव साजरा करत असते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करत नागरिकांनी गर्दी न करता आणि सोशल डिस्टसिंग पळून गणेशोत्सव साजरा करावा, असेदेखील आवाहन तिने गणेशभक्त आणि नागरिकांना केले आहे.
TAGGED:
Eco friendly Bappa arrives