महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शूटिंगदरम्यान निर्मात्यासह अभिनेत्री माही गिलला मारहाण - mir road

साकेत सावनी आणि माही गिल यांचा एक व्हिडिओ दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे .यामुळे ही सगळी माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

शूटिंगदरम्यान निर्मात्यासह अभिनेत्री माही गिलला मारहाण

By

Published : Jun 20, 2019, 10:48 AM IST

Updated : Jun 20, 2019, 10:55 AM IST

मुंबई - 'फिक्सर' या शोच्या शूटवेळी अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. या मारहाणीत निर्माता साकेत सावनी यांनाही दुखापत झाली आहे. तर, पोलिसांनीही यावेळी अज्ञात गुंडाची साथ दिल्याचा आरोप माही गिलने केला आहे.

साकेत सावनी आणि माही गिल यांचा एक व्हिडिओ दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. यामुळे ही सगळी माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मीर रोड येथील स्टुडिओत हे शूट सुरु होते.

शूटिंगदरम्यान निर्मात्यासह अभिनेत्री माही गिलला मारहाण

प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.

या हल्ल्याबाबत माही गिल आणि काही सदस्य आज (२० जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Last Updated : Jun 20, 2019, 10:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details