महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्मानच्या 'ड्रीमगर्ल'ची मोहिनी कायम, जाणून घ्या कमाई - ekta kapoor

'ड्रीमगर्ल' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा, अन्नु कपूर, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, मनज्योत सिंग, निधी बिस्ट, राजेश शर्मा आणि राज भंसाळी यांच्याही भूमिका पाहायला मिळाल्या.

आयुष्मानच्या 'ड्रीमगर्ल'ची मोहिनी कायम, जाणून घ्या कमाई

By

Published : Sep 22, 2019, 3:17 PM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा 'ड्रीमगर्ल' चित्रपट चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुष्मानच्या करिअरमधला सर्वाधिक कमाई करुन दमदार ओपनिंग केलेल्या या चित्रपटाने शंभर कोटीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'अंधाधून' आणि 'बधाई हो' चित्रपटानंतर आता 'ड्रीमगर्ल' चित्रपट देखील सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत ८६.६० कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा -'गली बॉय'ची 'ऑस्कर'वारी, बॉलिवूडकरांनी दिल्या प्रतिक्रिया

'ड्रीमगर्ल' चित्रपटाला शर्यत देण्यासाठी सोनम कपूर - दुलकर सलमानचा 'झोया फॅक्टर', करण देओल - सहिर बांबा यांचा 'पल पल दिल के पास' आणि संजय दत्तचा प्रस्थानम चित्रपटही या आठवड्यात प्रदर्शित झाले. तरीही 'ड्रीमगर्ल'च्या कमाईवर या चित्रपटांचा परिणाम झाला नाही. त्यामुळे लवकरच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करेल, असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे.

'ड्रीमगर्ल' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा, अन्नु कपूर, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, मनज्योत सिंग, निधी बिस्ट, राजेश शर्मा आणि राज भंसाळी यांच्याही भूमिका पाहायला मिळाल्या.

हेही वाचा -रामायणाच्या प्रश्नावरुन ट्रोल होणाऱ्या सोनाक्षीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, राज शांड्यल्य यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटानंतर आयुष्मान 'बाला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details