महाराष्ट्र

maharashtra

डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, डॉक्टर लागू अनंतात विलीन

By

Published : Dec 20, 2019, 2:58 PM IST

शतकामध्ये त्यांच्या सारखा कलाकार होणे नाही, त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन अनेक कलाकार पुढे आले त्यांना राज्य सरकार आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने श्रद्धांजली वाहतो, असे सांगत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांनी डॉक्टर लागू यांना श्रद्धांजली वाहिली....

Shriram lagoo last journy
डॉक्टर लागू अनंतात विलीन

पुणे - रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशान भूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले. सरकारच्या वतीने मंत्री सुभाष देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. कुठलेही धार्मिक विधी न उरकता डॉ. लागुंना अखेरचा निरोप देण्यात आला.

डॉ. श्रीराम लागूंबाबत बोलताना सुभाष देसाई

डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. शतकामध्ये त्यांच्या सारखा कलाकार होणे नाही, त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन अनेक कलाकार पुढे आले. त्यांना राज्य सरकार आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने श्रद्धांजली वाहतो, असे सांगत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांनी डॉक्टर लागू यांना श्रद्धांजली वाहिली.

मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अजरामर भूमिका साकार करत आपल्या नावाचा डंका गाजवणारे डॉक्टर श्रीराम लागू यांचे 17 डिसेंबरला निधन झाले होते. त्यांच्यावर 20 डिसेंबर शुक्रवारी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यक्रिया करण्यात आली. डॉक्टर लागू यांचे पार्थिव शुक्रवारी अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात आले होते. यावेळी पुणेकर नागरिक तसेच राज्यातून आलेले संस्कृती, कला क्षेत्रातील मान्यवर, राजकीय क्षेत्रातील मान्यवर अशा अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.....

ABOUT THE AUTHOR

...view details