मुंबई - फ्रान्सचा लोकप्रिय 'डीजे स्नेक' भारतात येऊन सनबर्न म्युझिक फेस्टीव्हलमध्ये परफॉर्म करायला तयार झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातील तो मुंबईत आला होता. 'लेट मी लव यू', 'लीन ऑन' यासारख्या गाण्यासाठी प्रसिध्द असलेला डीजे स्नेक आपला नवा अल्बम 'कार्ते ब्लांचे'मधील गाण्यावर भारतात परफॉर्म करेल.
फ्रान्सचा 'डीजे स्नेक' भारतात जलवा दाखवायला येतोय पुन्हा
भारतात जलवा दाखवण्यासाठी फ्रान्सचा डीजे स्नेक गोव्यात दाखल होणार आहे. सनबर्न फेस्टीव्हल २७ डिसेंबरपासून गोव्यात सुरू होत आहे.
डीजे स्नेक म्हणाला, "भारतात परत येण्यासाठी मी उत्साही आहे. मी जेव्हा तिथे होळीच्या वेळी होतो, तेव्हा भरपूर सकारात्मक उर्जा आणि जोश अनुभवला आहे. जेव्हा तुम्ही कामाच्या निमित्ताने गेले असताना सण साजरा होत असतो आणि त्याचा जेव्हा अर्थ कळतो तेव्हा हा अनुभव नेहमी शानदार असतो. मी जेव्हा प्रवास करीत असतो तेव्हा मी शिकण्याला प्राधान्य देतो.
'कार्ते ब्लांचे' अल्बमधील गाणी गोवा दौऱ्यावर सादर करण्यासाठी डीजे स्नेक खूप उत्साहित झाला आहे. सनबर्न फेस्टीव्हल २७ डिसेंबरपासून गोव्यात सुरू होत आहे.