महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 21, 2019, 11:04 AM IST

ETV Bharat / sitara

'किंग खान'सोबतच बॉलिवूडचे 'हे' कलाकार देणार 'द लॉयन किंग' चित्रपटात आवाज

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुख्य पात्र 'लॉयन किंग'ला शाहरुख खानचा आवाज मिळणार आहे. तर, 'सिंबा'च्या पात्राला शाहरुखचा मुलगा आर्यनचा आवाज मिळणार आहे.

'किंग खान'सोबतच बॉलिवूडचे 'हे' कलाकार देणार 'द लॉयन किंग' चित्रपटात आवाज


हॉलिवूडचा 'द लॉयन किंग' चित्रपट हिंदी व्हर्जनमध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुख्य पात्र 'लॉयन किंग'ला शाहरुख खानचा आवाज मिळणार आहे. तर, 'सिंबा'च्या पात्राला शाहरुखचा मुलगा आर्यनचा आवाज मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रटातील इतर पात्रांनाही बॉलिवूडच्या दिग्गज कलाकाराचा आवाज लाभणार आहे. कोणत्या पात्राला कोणाचा आवाज मिळणार याची माहिती समोर आली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती शेअर केली आहे.

द लॉयन किंगच्या 'स्कार' या पात्राला अभिनेते आशिश विद्यार्थी यांचा आवाज मिळणार आहे.

आशिश विद्यार्थी

श्रेअस तळपदे हा 'टिमॉन'च्या पात्राला आवाज देणार आहे.

श्रेअस तळपदे

संजय मिश्रा हे 'पुंबा' या पात्राला आवाज देणार आहे.

संजय मिश्रा

आसरानी हे 'जाजू' या पात्राला आवाज देणार आहेत.

आसरानी

हा चित्रपट १९ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details