मुंबई- 'अवतार' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बहुप्रतिक्षीत 'अवतार-२' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता एक वर्ष उशीरा म्हणजेच १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अवतार-२'साठी प्रेक्षकांना करावी लागणार आणखी प्रतिक्षा, रिलीज डेट बदलली - avatar sequel
जेम्स कॅमेरोन 'अवतार २' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. वॉल्ट डिज्नी स्टुडिओजच्या अधिकृत अकाऊंटवरून चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटबद्दलची घोषणा करण्यात आली आहे.
याचाच अर्थ चित्रपटाचे पुढील सर्वच भाग लांबणीवर पडणार आहेत. म्हणजेच, 'अवतार-३' आता १७ डिसेंबर २०२१ ऐवजी २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होईल. 'अवतार-४' २०२४ ऐवजी १९ डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होईल, तर चित्रपटाचा पाचवा पार्ट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
जेम्स कॅमेरोन 'अवतार २' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. वॉल्ट डिज्नी स्टुडिओजच्या अधिकृत अकाऊंटवरून चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. 'अवतार'च्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच निराशा करणारी असणार आहे.