मुंबई - बॉलिवूडची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून दिशा पाटणीची ओळख आहे. तिच्या सोशल मीडिया पेजवरही तिचे बरेचसे बोल्ड फोटो पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच ती 'मलंग' चित्रपटात झळकली. या चित्रपटातही तिचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला. आता 'बागी ३' चित्रपटातही तिच्या डान्सची झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील तिचा टायगर श्रॉफसोबत ऑनस्क्रिन रोमान्स असलेलं 'डू यू लव्ह मी' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
दिशा आणि टायगरच्या रिलेशनशिपच्या नेहमीच चर्चा रंगताना दिसतात. त्यामुळे 'बागी ३' मध्ये दोघांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'डू यू लव मी' या गाण्यामध्ये दिशा पाटणी तिच्या हॉट अंदाजात पाहायला मिळते आहे. दिशानं या गाण्यात आपल्या बोल्ड लूकने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.