मुंबई -बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून दिशा पाटणीला ओळखले जाते. दिशा सध्या तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करत असतात. सोशल मीडियावरही ती तिच्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करते. अभिनेता टायगर श्रॉफसोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चाही पाहायला मिळतात. मात्र, आपला जीवनसाथी कसा असावा, याबाबत दिशाने एक इच्छा बोलून दाखवली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना दिशा म्हणाली, 'प्रेम ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ते आपल्याला प्रेरणा देते. आपण आयुष्यात जे करतो ते एकतर प्रेमासाठी असतं किंवा प्रेमामुळे आपण ती गोष्ट करत असतो. प्रेमाशिवाय कोणीच राहू शकत नाही. माझ्यासाठी प्रेमात पडणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण एखाद्या फुलपाखराप्रमाणे उडतोय, असं वाटत असेल, तर ते प्रेमात पडण्याचे एक लक्षण आहे. मला असा जीवनसाथी हवा, जो मला मी मुलगी असल्याची जाणीव करुन देईल'.
हेही वाचा -सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, 'इतकी'आहे पहिल्या दिवशीची कमाई