मुंबई -बॉलिवूड कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन भेटीला येत असतात. सध्या विविध बॉलिवूड कलाकार हे त्याच्या स्वत:च्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी आलिया भट्ट हिनेही आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. आता तिच्या पाठोपाठ अभिनेत्री दिशा पटाणीनेही आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. यावर तिने तिचा पहिला व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
दिशा या चॅनेलच्या माध्यमातून तिचं वर्कआऊट सेशन, फिटनेस फंडे, तिची दैनदिन शैली, फॅशन टीप्स, याबाबत संवाद साधताना दिसणार आहे. तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिच्या यूट्यूब चॅनलबद्दलची माहिती शेअर केली आहे.