मुंबई- 'एम.एस.धोनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशा पटानीने काही काळातच प्रेक्षकांची मने जिंकली. तर दुसरीकडे 'आशिकी २' या चित्रपटाने आदित्य रॉय कपूरची चॉकलेट बॉय अशी प्रतिमा निर्माण केली. बॉलिवूडचे हेच दोन प्रसिद्ध कलाकार आता लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'मलंग' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात झाली आहे.
'आज से मलंग', दिशा अन् आदित्यनं केली चित्रीकरणाला सुरूवात
दिशा पटानीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. आज से मलंग असे कॅप्शन देत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे
दिशा पटानीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. आज से मलंग असे कॅप्शन देत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. चित्रपटात आदित्य आणि दिशाशिवाय अनिल कपूर आणि कुणाल केमूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मोहित सुरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर भूषण कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असणार आहे. २०२० मध्ये व्हेलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे, त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास असणार आहे.