महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मराठी ‘रॅपर’, निर्माता, लेखक, दिग्दर्शक श्रेयश जाधव 'विदर्भ रत्न' पुरस्काराने गौरवांकित! - Director Shreyash Jadhav got Vidarbha Ratna award

मराठी मनोरंजनसृष्टीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक, लेखक अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘किंग जे. डी’ म्हणजेच श्रेयश जाधवला आर. पी. समर्थ स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणार्या 'विदर्भ रत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Director Shreyash Jadhav
श्रेयश जाधव यांना मिळाला विदर्भ रत्न पुरस्कार

By

Published : Jan 31, 2021, 1:36 AM IST

अवॉर्ड्स कोणाला नाही आवडत? अभिनेता, अभिनेत्री यांना जेव्हा अवॉर्ड्स मिळतात तेव्हा त्यांची चर्चा जास्त होत असते. परंतु पडद्यामागच्या कलाकारांना देखील त्यांच्या अवॉर्ड्सबद्दलही चर्चा झालेली आवडत असणार. मराठी मनोरंजनसृष्टीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक, लेखक अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘किंग जे. डी’ म्हणजेच श्रेयश जाधवला आर. पी. समर्थ स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणार्या 'विदर्भ रत्न' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रेयश जाधव यांना मिळाला विदर्भ रत्न पुरस्कार

हेही वाचा -अनन्या पांडेचा हॉट अंदाज पाहिलात का?

विदर्भात जन्मलेल्या श्रेयशचा सिनेसृष्टीतील हा यशस्वी प्रवास निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. इतक्या कमी वयात त्याने सिनेसृष्टीत भरपूर नाव कमावले. त्याच्या याच कारकिर्दीची दखल घेत त्याला 'विदर्भ रत्न' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आमदार आर. पी. समर्थ यांच्या ५० व्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ३० जानेवारी रोजी नागपूर येथे महापौर दयाशंकर तिवारी, विधान परिषदेचे सदस्य ॲड. अभिजीत वंजारी आणि दळवी मेमोरिअल हॉस्पिटलचे अध्यक्ष बलबीरसिंग रेणू यांच्या उपस्थितीत झाले.

श्रेयश जाधव यांना मिळाला विदर्भ रत्न पुरस्कार

श्रेयस जाधव ने ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘बघतोस काय मुजरा कर' आणि ‘बस स्टॉप’ या चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ‘मी पण सचिन’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण केले. महाराष्ट्राचा सुपरस्टार स्वप्नील जोशीची त्यात प्रमुख भूमिका होती व श्रेयसने याची कथाही लिहिली होती. श्रेयशने चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण, आशयपूर्ण देण्याचा प्रयत्न केला. आज अनेकदा मराठी सिनेसृष्टीत रॅप, हिप हॉप साँग्सचा प्रयोग केला जातो. मात्र मराठी इंडस्ट्रीला या वेस्टर्न म्युझिकची खरी ओळख श्रेयशने करून दिली आहे.

‘रॅप सॉन्ग’ हा ॲफ्रो-अमेरिकन संगीतप्रकार आपल्याकडेही रुळायला लागला आहे परंतु मराठीमध्ये अजून तो प्रकार तेव्हडा लोकप्रिय नाहीये. या वातावरणातही श्रेयस जाधवने मराठीमध्ये रॅप लोकप्रिय करण्यात पुढाकार घेतला. रॅप सॉंगमधूनही श्रेयशने सामाजिक विषय अतिशय उत्तमरित्या हाताळले. म्हणूनच प्रेक्षकांनी कायमच त्याच्या कलाकृतीला पसंती दिली.

प्रेक्षकांची नाळ ओळखून त्यांना दर्जेदार चित्रपट देणारा श्रेयश आता 'मनाचे श्लोक', 'फकाट', बघतोस काय मुजरा कर २', 'मीटर डाऊन' असा मनोरंजनाचा जबरदस्त खजिना घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details