महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिग्दर्शक ओम राऊत प्रभासला घेऊन बनवणार भव्यदिव्य थ्रीडी सिनेमा ‘आदीपुरूष’! - आदीपुरूष’

दिग्दर्शक ओम राऊत याने त्याच्या आगामी ‘आदीपुरुष’ या सिनेमाची आज घोषणा केली आहे. या भव्य थ्रीडी चित्रपटात बाहुबली फेम प्रभास मुख्य भूमिका साकारणार आहे. भारतीय पुराणकथेवर आधारित सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याची गोष्ट सांगणारा हा एक आगळावेगळा सिनेमा असेल. मात्र त्याची कथा नक्की इतिहासातील कोणत्या घटनेवर आधारित आहे ते अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

ADIPURUSH
आदीपुरूष’

By

Published : Aug 18, 2020, 4:13 PM IST

मुंबई - ‘लोकमान्य’, ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊत याने त्याच्या आगामी सिनेमाची आज घोषणा केली आहे. अभिनेता प्रभास, दिग्दर्शक ओम राऊतची कंपनी रेट्रोफिलिज आणि टी-सिरिज कंपनीचे भूषण कुमार यांनी एकत्र येऊन ‘आदीपुरुष’ या थ्रीडी सिनेमाची घोषणा केली आहे. भारतीय पुराणकथेवर आधारित सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याची गोष्ट सांगणारा हा एक आगळावेगळा सिनेमा असेल. मात्र त्याची कथा नक्की इतिहासातील कोणत्या घटनेवर आधारित आहे ते अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

तान्हाजी या सिनेमाच्या यशानंतर ओम राऊत पुढे काय करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. तसंच बाहुबली या सिनेमाच्या यशानंतर प्रभास पुन्हा मोठा सिनेमा कधी करणार असा प्रश्न त्याला विचारला जाऊ लागला होता. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ‘आदीपुरूष’ हा सिनेमा असेल असं या दोघांनी स्पष्ट केलेलं आहे. भव्य सेट्स, जबरदस्त कॉश्च्युम्स, तेवढाच उत्तम मेकअप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळे दिपवून टाकतील असे व्हीएफएक्स या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतील.

‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘तान्हाजी’ या सिनेमांसाठी व्हिएफएक्सची जबाबदारी उचलणारे प्रसाद सुतार हेच ‘आदीपुरूष’ या सिनेमाचे व्हिएफएक्स करणार आहेत. त्याशिवाय ते स्वतः या सिनेमाचे सहनिर्माते देखील असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा हिंदी आणि तेलुगु या दोन भाषांमध्ये एकाच वेळी शूट केला जाईल. याशिवाय तमिळ, मल्याळम, कन्नडा आणि इतर परदेशी भाषांमध्ये तो भाषांतरीत केला जाणार आहे. त्यामुळे रिलीज होताना एकाच वेळी पाच भाषांमध्ये रिलीज होणारा हा सिनेमा असेल. याशिवाय या सिनेमातील नकारात्मक भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अजून एक मोठा स्टार दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्या स्टारचं नाव तुर्तास जाहिर करण्यात आलेलं नाही.

ओम राऊत यांनी प्रभासने आपल्यासोबत काम करायला होकार दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानले आहेत. प्रभासने माझ्या व्हिजनवर विश्वास ठेवून हा मोठा सिनेमा करायला होकार दिल्याबद्दल मी त्याचा ऋणी असून त्याच्या विश्वासास सार्थ ठरेन असं काम माझ्या हातून निश्चितच घडेल असं ओमने सांगितलं आहे. दुसरीकडे टी-सिरिजने या सिनेमाची निर्मिती करायला होकार दिल्याबद्दल त्याने भूषण कुमार यांचेही आभार मानले आहेत. बाहुबलीनंतरचा प्रभासच्या ‘साहो’ या सिनेमाची सहनिर्मिती टी-सिरिजने केलेली होती. त्यानंतर यावर्षी प्रभास आणि दीपिका पदुकोण यांचा ‘राधे श्याम’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली या सिनेमाची निर्मिती देखील टी-सिरिजच करणार आहे. त्यानंतर ओम राऊत यांच्या ‘आदीपुरूष’ या सिनेमात काम करायला होकार दिल्याने टी-सिरिजसोबतचा प्रभासचा हा तिसरा सिनेमा असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details