दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मणिरत्नम यांना हृदयाशी संबधीत आजारामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांनी लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले आहे. २००४ मध्ये त्यांना एकदा 'युवा' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका देखील येऊन गेला होता. तेव्हादेखील त्यांची प्रकृती बिघडली होती.
मणिरत्नम यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबाबत लोकेश नावाच्या युजरने माहिती शेअर केली आहे.