मुंबई - दिल्लीमध्ये कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत आणि पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजित दोसांझ यांच्यात टि्वटर वॉर सुरू आहे. यामुळे नेटकऱ्यांचे मनोरंजन होत आहेच. मात्र, यासोबतच गायक दिलजित दोसांझला कंगनासोबत घेतलेला पंगा फायद्यात पडल्याचे दिसत आहे. कंगना विरुद्ध दिलजित दोसांझ यांच्यात टि्वटर युजर्सनी दिलजित यांचा पक्ष घेतला आहे. दिलजित दोसांझचे टि्वटर फॉलोवर्स 5 लाखाने वाढले आहेत.
गेल्या 29 नोव्हेंबरला त्यांचे 38 लाख 37 हजार 703 फॉलोवर्स होते. तर 4 डिसेंबरला त्यांचे 46 लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच टि्वटरवर #DiljitDestroysKangana आणि #DiljitVsKangana हे दोन हॅशटॅग शुक्रवारी ट्रेंड करत होते.
कृषी आंदोलनातील एका महिलेवर कंगनाने टि्वट केल्यानंतर कंगना रणौत आणि दिलजित दोसांझ यांच्या वादाला सुरवात झाली होती. शेतकरी आंदोलनात 100 रुपये देऊन एक वृद्ध महिला सहभागी झाल्याचे वक्तव्य कंगना रणौतने केले होते. तसेच दिलजीत दोसांजला कंगनाने एका ट्विटमध्ये करण जोहरचा 'पालतू' (पाळीव) असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावर दिलजीतने संताप व्यक्त करत ट्विटरवर कंगनाला चांगलेच फटकारले होते.
कंगनाचे टि्वट -