मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि जस्सी गिल यांचा 'पंगा' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कंगना रनौत या चित्रपटात कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील 'दिल ने कहा' हे रोमॅन्टिक गाणं रिलीझ झालं आहे.
जस्सी गिल आणि असीस कौर यांनी हे गाणं गायलं आहे, तर शंकर-एहसान-लॉय यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. जावेद अख्तर यांनी हे गाणं लिहिलं आहे.
या गाण्यात कंगना रनौत आणि जस्सी गील यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते.
हेही वाचा -अमिताभ बच्चनपासून ते हृतिकपर्यंत सर्वांनाच 'या' डान्सरने लावले वेड, पाहा व्हिडिओ
'पंगा' हा चित्रपट कौटुंबीक जबाबदारी आणि खेळाबद्दलचे प्रेम यांच्यामध्ये अडकलेल्या महिलेच्या कथेवर आधारित आहे. यामध्ये कंगना 'जया'च्या भूमिकेत दिसणार आहे. जस्सी गिल हा तिच्या पतीच्या भूमिकेत तर नीना गुप्ता तिच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री रिचा चढ्ढाचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. ती कंगनाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल.
अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'अनन्या' सिनेमाचा मुहूर्त संपन्न, अभिनेत्री ऋता दुर्गुळे साकारणार 'अनन्या'