महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मार्क रुफलोला 'हल्क' साकारण्याचा रॉबर्ट डाउनीने दिला होता सल्ला !! - hult trivia

यापूर्वी एडवर्ड नॉर्टनने केलेली हल्क ऊर्फ ब्रुस बॅनरच्या भूमिकेत पाऊल ठेवण्यास मार्क रफॅलो घाबरला होता. रॉबर्ट डाउने जूनियर यांनीच त्यांना भूमिकेत घेण्यास सांगितले, असा खुलासा मार्क यांने मुलाखतीत .केला आहे

Mark Ruffalo
मार्क रफॅलो

By

Published : May 11, 2020, 1:26 PM IST

लॉस एंजेलिसः अभिनेता मार्क रुफॅलो याने म्हटलंय की, ''आयर्न मॅन स्टार रॉबर्ट डाउनी ज्युनियरने त्याला हल्क उर्फ ​​ब्रुस बॅनरची भूमिका करण्यासाठी आणि अ‍ॅव्हेंजर्समधील मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (एमसीयू) जॉईन करण्याचा सल्ला दिला होता.''

२०१२ पासून एमसीयूचा अविभाज्य भाग असलेल्या या अभिनेत्याने जिमी फॅलनच्या चॅट शोमध्ये ऑनलाइन हजेरी लावली असताना हा खुलासा केला.

''ही भूमिका साकारताना मी घाबरलो होतो. कारण २००८ मध्ये एडवर्ड नॉर्टन यांनी हल्कची भूमिका अप्रतिम केली होती. एरिक बना यांनी २००३ मध्ये आणि लू फेरीग्नो यांनी १९७० च्या टीव्ही मालिकेमध्ये हल्क साकारला होता.''

''माझ्या अगोदर इतके चांगले काम झाले होते की मी यात काय नवीन भर घालणार हे मला कळत नव्हते. मी आतापर्यंत फक्त सामान्य चित्रपट करत होतो. म्हणूनच या भूमिकेसाठी मी योग्य होतो की नाही याबद्दल माहिती नव्हते,'' असेही त्यांनी पुढे सांगितले.

रफॅलो म्हणाला की, ''अ‍ॅव्हेंजर्सचे दिग्दर्शक जोस व्हेडन यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी सांगितले की तो या भागासाठी परिपूर्ण आहे आणि त्यानंतर डॉवने जूनियरने त्याला काम करण्यास सांगितले.''

जोस व्हेडनसारख्यानेही मी योग्य व्यक्ती असल्याचे सांगितले आणि त्यानंतर मला डाउनीचाही फोन आला. त्याने मला हे करायला भाग पाडले, असेही त्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details