महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

...अन् 'या' कारणामुळे दिया मिर्झाला कार्यक्रमात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ - Dia Mirza at Jaipur Literature Festival

दिया मिर्झाने जयपूरच्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात वातावरणात घडणाऱ्या बदलांविषयी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले होते.

Dia Mirza emotional video viral, Dia Mirza latest news, Dia Mirza in jaypur Literature Festival, Dia Mirza at Jaipur Literature Festival, दिया मिर्झाला कार्यक्रमात अश्रू अनावर
...अन् 'या' कारणामुळे दिया मिर्झाला कार्यक्रमात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

By

Published : Jan 28, 2020, 12:47 PM IST

जयपूर -अभिनेत्री दिया मिर्झा सध्या चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्या सामाजिक कार्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. बऱ्याच सामाजिक मुद्द्यांवर ती तिचे स्पष्ट मतही मांडत असते. अलीकडेच तिने जयपूरच्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात वातावरणात घडणाऱ्या बदलांविषयी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना दिया मिर्झाला अश्रू अनावर झाले.

दियाला सर्वात जास्त इमोशनल करणारी गोष्ट कोणती आहे, असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. यावर बोलताना ती म्हणाली, की 'दररोज माझा दिवस चांगल्या पद्धतीने सुरू होतो. मात्र, २७ जानेवारीची सकाळ ही माझ्यासाठी फारच धक्कादायक होती. यावेळी मला बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटच्या अपघाताविषयी कळाले. कॅलिफोर्निया येथे झालेल्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत ब्रायंटसह त्याच्या १३ वर्षाच्या मुलीचेही निधन झाले. या घटनेने माझे मन विचलित झाले आहे'.

दिया मिर्झाला कार्यक्रमात अश्रू अनावर

हेही वाचा -अक्षयच्या 'बेल बॉटम'ची नवी तारीख तर दीपिकाच्या नव्या चित्रपटाची घोषणा, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

कोबीची आठवण सांगताना दिया अतिशय भावुक झाली होती. कोबी ब्रायंट हा 'ब्लॅक माम्बा' म्हणूनही ओळखला जात होता. त्याच्या निधनामुळे बास्केटबॉल क्षेत्रातील एक दिग्गज हिरा हरवला आहे.

कोबी ब्रायंटच्या निधनाचे वृत्त समजताच कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. बऱ्याच जणांना कोबीच्या निधनामुळे धक्का बसला आहे. प्रियांका चोप्रा, वरुण धवन, रणवीर सिंग यांनीदेखील कोबी ब्रायंटसाठी पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा -#RIPMamba: अक्षय कुमार, प्रियांका चोप्राची कोबी ब्रायंटसाठी भावनिक पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details