महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दीया मिर्झा १५ फेब्रुवारीला वैभव रेखीशी बांधणार लग्नगाठ?

अभिनेत्री दीया मिर्झाला पुन्हा प्रेम गवसले आहे. पहिल्या पतीपासून वेगळे झालेली दीया १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील व्यावसायिक वैभव रेखीशी विवाहबंधनात अडकणार आहे.

Dia Mirza
दीया मिर्झा

By

Published : Feb 13, 2021, 6:54 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा १५ फेब्रुवारी रोजी व्यावसायिक वैभव रेखीशी विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नात केवळ नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी होणार असल्याचे या जोडप्याने म्हटले आहे.

वरुण धवन-नताशा दलालानंतर प्रियांक शर्मा-शाजा मोरानी ही बॉलिवूड जोडी विवाह बंधनात अडकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीया मिर्झा ही मुंबई स्थित व्यावसायिक वैभव रेखी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. येत्या १५ फेब्रुवारीला दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांच्या लग्नाबाबतच्या बातम्या झळकल्या असल्या तरीही या जोडप्याने याची अधिकृतघोषणा केलेली नाही.

दीया मिर्झाने यापूर्वी साहिल सांघा याच्याशी लग्न केले होते. दोघेही ५ वर्षानंतर २०१९ मध्ये विभक्त झाले आहेत. दोघांनी ११ वर्षे एकमेकांना ओळखल्यानंतर १८ ऑक्टोबर २०१५ मध्ये विवाह केला होता. दोघांनी मैत्रीपूर्ण मार्गाने एकमेकांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. वैभव याचेही योगा टीचर सुनैना रेखीसोबत लग्न झाले होते. त्यांना एक मुलगीदेखील आहे.

कामाच्या पातळीवर विचार करता दीया मिर्झा सुपरस्टार नागार्जुनची भूमिका असलेल्या आगामी तेलगू अ‍ॅक्शन-थ्रिलरमध्ये दिसणार आहे. नवोदित अहिशोर सोलोमन यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सय्यामी खेर आणि अतुल कुलकर्णी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा - ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला ‘गर्लफ्रेंड’ भेटायला येतेय शेमारू मराठीबाणावर!

ABOUT THE AUTHOR

...view details