मुंबई -सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी राजकारण हा विषय सर्वांच्याच जवळचा असतो. यंदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून झालेले राजकारण सर्वांनाच ठावुक आहे. राजकीय समीकरणं हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेर असतात. त्यामुळेच राजकारणात कधी काय होईल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. अशाच आशयावर आधारित असलेला 'धुरळा' हा चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात येऊन धडकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
#पुन्हानिवडणूक या हॅशटॅगमुळे 'धुरळा' चित्रपटाबाबत आधीच फार चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर #पुन्हानिवडणूक यामागचं कारण प्रेक्षकांना समजले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यातील कलाकारांनी हा हटके फंडा वापरला होता.