मुंबई - अभिनेता धर्मेंद्र यांची पंजाबमध्ये शेती आहे. आपल्या शेतात ते स्वतः कष्ट करीत असतात. यातील पिके, गाई, म्हशी यांच्याबद्दलचा जिव्हाळा ते सोशल मीडियावरुन नेहमी शेअर करीत असतात. आता त्यानी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय.
धर्मेंद्र यांनी शेअर केला शेती आणि फार्म हाऊसचा व्हिडिओ - Darmendra Deol
धर्मेंद्र यांनी शेतातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. कोबीचे पीक त्यांनी घेतलंय. शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून त्यांनी हाच खरा हिरो असल्याचे म्हटलंय.
धर्मेंद्र
धर्मेंद्र यांच्या शेतात सध्या कोबीचे पीक आहे. त्यांचे इथे फार्म हाऊसही आहे. तिथे काम करणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांनी व्हिडिओ बनवलाय. काही तासातच हजारो व्यूव्ह्ज मिळाले आहेत.
दुसऱ्या एका व्हिडिओत धर्मेंद्र आपल्या फार्म हाऊसमध्ये आराम करताना दिसत आहेत. हे त्यांचे आवडते ठिकाण आहे. शहराच्या दगदगीपासून दूर निवांत असलेल्या या फार्म हाऊसमध्ये त्यांना आनंद मिळतो.