मुंबईः बॉलिवूडचे दिग्गज धर्मेंद्र लुधियाना येथील आपल्या आवडत्या सिनेमा हॉल रेखीची अवस्था पाहून खूप दुःखी झाले आहेत.
धरे्मेंद्र यांनी ट्विटरवर हॉलचा एक फोटो शेअर केला आणि सद्य परिस्थिती पाहून क्लेश व्यक्त केला. त्यांनी लिहिले, "रेखी सिनेमा ... इथे अगणित चित्रपट पाहिले आहेत ... ही शांतता पाहून हृदय दु: खी झाले आहे."
मीनर्व्हानंतर रेखी हे लुधियानामधील दुसरे सर्वात जुने थिएटर आहे. ते ब्रिटीश काळातील आहे. याची सुरुवात 1933 मध्ये झाली होती. मात्र, धर्मेंद्रने शेअर केलेल्या त्याच्या फोटो ते खूप जुन्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
धर्मेंद्र यांनी ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. चित्रपट पाहताना खाण्याबद्दल चाहत्याने विचारले असता ते म्हणाले, "बजेटमध्ये ... एक चवन्नी ... टिक्की समोस्यासाठी नेहमी ठेवत असे."
हेही वाचा 'माय मेलबर्न' : कबीर, इम्तियाज, रीमा आणि ओनीर चौकडीची व्हिक्टोरियन टीमसोबत हातमिळवणी
एका चाहत्याने विचारले की, या सिनेमा हॉलमध्ये पाहिलेला शेवटचा चित्रपट कोणता होता? आणि धर्मेंद्र यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. 'दिलीप साहेबांचा दीदार हा चित्रपट १६ मार्च १९५१ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन बोस यांनी केले होते. चित्रपटात दिलीप कुमार यांच्या व्यतिरिक्त अशोक कुमार, नर्गिस, निम्मी आणि मुराद यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या."