मुंबई -बॉलिवूडचे धरम पाजी म्हणजे धर्मेंद्र यांचा नातू करण देओल हा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. त्याचा 'पल पल के दिल के पास' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. एका रोमॅन्टिक कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. अशातच धर्मेंद्र यांनी करणचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये करण खूपच क्यूट दिसत आहे.
करणच्या निमित्ताने देओल कुटुंबाची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यापूर्वी देओल कुटुंब हे अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखले जात होते. मात्र, करण देओल हा एका रोमॅन्टिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांनी करणच्या अभिनयाची प्रशंसा केली. या चित्रपटात त्याच्यासोबत सहेर बांबा ही नवोदीत अभिनेत्री झळकणार आहे.
हेही वाचा-महिन्याला दीड हजार कमावणाऱ्या अमरावतीच्या बबिता ताडे झाल्या करोडपती, पाहा व्हिडिओ