मुंबई - 'ड्रिम गर्ल' आणि आता भाजपच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वी 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत 'स्वच्छता मोहीम' राबवली होती. इतर भाजप खासदारांसोबत हेमा यांनी संसदेच्या परिसरात ही मोहीम राबवली. त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, त्यांची मोहीम पाहून सोशल मीडियावर त्या प्रचंड ट्रोल झाल्या. त्यांचा हा व्हिडिओ पाहुन धर्मेंद्र यांनी देखील आपली भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
हेमा मालिनींची स्वच्छता मोहिम पाहून धर्मेंद्र म्हणतात... - mahatma gandhi
भाजप खासदारांसोबत हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वी 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत 'स्वच्छता मोहीम' राबवली होती. मात्र, त्यांची मोहीम पाहून सोशल मीडियावर त्या प्रचंड ट्रोल झाल्या.
हेमा मालिनी यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी धर्मेंद्र यांना प्रश्न विचारला, की 'हेमा यांनी कधी झाडु हातात घेतला होता का?' या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अतिशय मजेशीर अंदाजात दिले आहे. ते म्हणाले, की 'हो, चित्रपटांमध्येच. मला पण ती अनाडीच वाटत होती. पण, मी मात्र, लहाणपणी माझ्या आईला नेहमीच कामात मदत केली. झाडू मारण्यात तर मी तरबेज होतो. मला स्वच्छता खूप आवडते.' त्यांच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांनीही भरभरुन कमेंट्स केले आहेत.