मुंबई - 'ड्रीम गर्ल' या अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार पध्दतीने सुरू आहे. यातील 'ढगाला लागली कळ' या गाण्याची सध्या प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाचे प्रमोशन साँग यावेळी मराठी असणार आहे. दादा कोंडके यांचे प्रचंड लोकप्रिय असलेले 'ढगाला लागली कळ' हे नव्या धाटणीचे गाणे आता लाँच करण्यात आलंय.
Video : 'ढगाला लागली कळ'ची प्रतीक्षा संपली, रितेश-नुशरतसह आयुष्यमानचा जोरदार परफॉर्मन्स - Mika Sing
'ढगाला लागली कळ' या गाण्याची उत्सुकता नव्याने ताणली गेली होती. 'ड्रीम गर्ल' या आगामी चित्रपटातील हे गाणे आता लाँच झाले आहे. रितेशचा जोरदार परफॉर्मन्स यात दिसून येतो.
ढगाला लागली कळ
या गाण्याचे वैशिष्य म्हणजे मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख या गाण्यात ठेका धरताना दिसतो. आयुष्यमान खुराणा आणि नुशरत भारुचा यांच्या जोडीने रितेश या गाण्यात थिरकलाय. यंदाच्या गणेशोत्सवाचे हे गाणे आकर्षण ठरणार आहे.
'ढगाला लागली कळ' हे नवे गाणे बॉलिवूडचे लोकप्रिय संगीतकार मित ब्रदर्स यांनी संगीतबध्द केलंय. मिका सिंगच्या संगतीने मित ब्रदर्श आणि ज्योतिका तंग्री यांनी हे या गीताला स्वरसाज चढवलाय. 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.