महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'फत्तेशिकस्त'मधील 'हेचि येळ देवा नका...' अभंग प्रेक्षकांच्या भेटीला - फत्तेशिकस्त

फर्जंद या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'फत्तेशिकस्त' हा दुसरा ऐतिहासिक थरारपट आहे. शिवकालीन गनिमी काव्याची ऐतिहासिक गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटातील नवा अभंग रिलीज झाला आहे.

'हेचि येळ देवा नका...' अभंग

By

Published : Oct 17, 2019, 6:41 PM IST


मुंबई - शिवकालीन गनिमी काव्याची ऐतिहासिक गोष्ट 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात मांडण्यात आली आहे. फर्जंद या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हा दुसरा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील 'हेचि येळ देवा नका...' हा अभंग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

'फत्तेशिकस्त' चित्रपटातील 'हेचि येळ देवा नका...' हा संत तुकाराम यांनी रचलेला अभंग आहे. संगीतकार गायक अवधूत गुप्ते यांचा भारदार स्वर या अभंगाला लाभलाय. देवदत्त मनिषा बाजी यांनी या अभंगाला संगीतबध्द केलंय.

राजमाता जिजाऊसाहेब, येसाजी कंक, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, केशर, बाळाजी, चिमणाजी, किसना यासारख्या योध्यांच्या पराक्रमाची गाथा 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारखी स्टारकास्टही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीच्या कथा नेहमी इतिहासात पाहायला मिळतात. आता 'फतेशिकस्त'च्या निमित्ताने शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची युद्धनिती १५ नोव्हेंबरला पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details