मुंबई - अभिनेता अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टील सर्वात लोकप्रिय व्यक्तीमत्व. मामा या टोपण नावाने सर्व कलाकार त्यांना ओळखतात. अनेक कलावंतांचे ते आवडते अभिनेता आहेत. रितेश देशमुखने त्यांचे एक गाणे पोस्ट करीत, अशोक सराफ माझे मराठीतील आवडते सुपरस्टार असल्याचे म्हटले आहे.
रितेश देशमुखच्या मते 'मामा'च आहे मराठीचा 'फेवरेट' सुपरस्टार - Bin Kamacha Navara
रितेश देशमुखने मराठीतील सर्वात आवडता कलाकार सुपरस्टार अशोक सराफ असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. त्याने एक इंग्लिश गाणे शेअर केले असून यावर अशोक सराफ आणि रंजना डान्स करताना दिसतात.
रितेशने शेअर केलेला व्हिडिओ फार गंमतीशीर आहे. 'बिन कामाचा नवरा' हा मराठी चित्रपट खूप गाजला होता. त्यातील 'अगं अगं म्हशी तू मला कुठं नेशी' हे गाणे खूप लोकप्रिय ठरले होते. अभिनेत्री रंजना आणि अशोक सराफ यांच्यावर चित्रीत झालेले हे गाणे यातील डान्स स्टेप्समुळे जास्त लोकांच्या स्मरणात आहे. या गाण्यावर आतापर्यंत अनेक मीम्स बनवण्यात आले आहेत.
रितेश देशमुखने आपल्या ट्विटरवर जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात इंग्लिश गाण्यावर अशोक सराफ आणि रंजना यांचा डान्स 'सींक' करण्यात आलाय. या गाण्यावरील त्यांचा डान्स पाहून न कळत चेहऱ्यावर हासू उमटते.