मुंबई- धूम चित्रपटांच्या मालिकेतील आता धूम-4 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एक अभिनेत्री मुख्य खलनायिका असणार आहे. त्यासाठी दीपिका पादुकोणचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिकादेखील पहिल्यांदाच 'ग्रे शेड'ची भूमिका साकारणार आहे. धूम 4 मध्ये अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राच्या भूमिकाही निश्चित मानल्या जात आहेत.
पहिल्या धूमपासून या चित्रपटांची मालिका भारतामध्ये सुपरहिट ठरली आहे. जॉन अब्राहम, हृतिक रोषन आणि आमिर खान यांनी साकारलेल्या खलनायकांच्या भूमिका हिरोपेक्षा जास्त भाव खाणाऱ्या होत्या. त्यामुळे दीपिकाला खलनायकाची भूमिका दिली तर तिच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असेल.