महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दीपिका पदुकोणने घेतली जेएनयू विद्यार्थ्यांची भेट, विद्यार्थ्यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन - Deepika Padukon visit JNU campus

अभिनेत्री दीपिका पदुकोणने जवाहरलाल विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध पूर्वीच केला आहे. या विद्यार्थ्यांना साथ देण्यासाठी तिने आज जेएनयू कँपसमध्ये जाऊन विचारपूस केली.

Deepika Padukon
दीपिका पदुकोण

By

Published : Jan 7, 2020, 9:19 PM IST

Updated : Jan 7, 2020, 10:32 PM IST


नवी दिल्ली - अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेचे कठोर शब्दात निषेध केला आहे. या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ देशभर सुरू असलेल्या आंदोलनालाही तिने पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी ती जेएनयू कँपसमध्ये दाखल झाली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमा झाले आणि जोरदार घोषणाबाजी केली.

दीपिका पदुकोणने घेतली जेएनयू विद्यार्थ्यांची भेट

अज्ञात गुंडांनी जेएनयू कँपसमध्ये घुसून विद्यार्थ्यांन जबर मारहान केली होती. यामुळे अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. जेएनयू विद्यार्थी युनियनची अध्यक्षा आयेशा घोष हिलाही गंभीर दुखापत झाली होती. आज झालेल्या आंदोलनात रुग्णालयातून उपचार घेऊन परतलेल्या आयेशाची भेट दीपिकाने घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी खूप जल्लोष केला.

जेएनयू कॅपसमध्ये सध्या दहशतीचे वातावरण असले तरी मोठ्या संख्येने गुंडागर्दीला विरोध करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने हजेरी लावली आणि आपला पाठिंबा दर्शवला.

जेएनयू कँपसमध्ये सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. एक प्रकारे दहशतीचे वातावरण इथे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अभिनेत्री दीपिकाने जेएनयू गाठले आणि विद्यार्थ्यांशी संवाद केला.

Last Updated : Jan 7, 2020, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details