मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी देखील झळकणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले होते.
या चित्रपटाच्या शूटिंगमधील बरेचसे सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये दीपिका आणि विक्रांतचे लूकही व्हायरल होत आहेत. अलिकडेच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका शाळेच्या गणवेशात दिसली. तर दिल्लीच्या रस्त्यावर उभी असतानाचेही व्हिडिओ समोर आले होते. मात्र, 'छपाक'च्या लूक मध्ये असलेल्या दीपिकाला कोणीही ओळखु शकले नाही.
एका व्हिडिओत दीपिका आणि विक्रांत एकमेकांना किस करताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या भोवताली चाहत्यांची गर्दीही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'राजी' चित्रपटानंतर आता त्यांच्या 'छपाक' चित्रपटाबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते आहे. दीपिका या चित्रपटामध्ये एका वेगळ्या आणि महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.